पद निवृत्तिवेतनासाठी लढा सुरु राहणार : पाटील
By Admin | Updated: July 28, 2015 00:32 IST2015-07-27T22:08:09+5:302015-07-28T00:32:51+5:30
माजी सैनिक मेळावा : देश वाचवण्यासाठी लढलेल्या जवानांना मानाचा मुजरा

पद निवृत्तिवेतनासाठी लढा सुरु राहणार : पाटील
अडरे : कारगिल विजयासाठी अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. काहींनी देश वाचवण्यासाठी लढा दिला. त्यांना एक पद एक निवृत्तिवेतनासाठी आमचा लढा सुरु राहणार असून, यासाठी सर्व माजी सैनिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादनभारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष एम. एन. पाटील यांनी केले. चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात कारगील विजयदिनानिमित्त माजी सैनिक मेळावा, वीरपत्नी, वीरमाता - पिता यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, नगरसेविका निर्मला चिंगळे, आदिती देशपांडे, कर्नल सी. जे. रानडे, व्ही. जी. सोनवणे, सुभेदार प्रदीप चाळके, मेजर जगन्नाथ आंब्रे, शर्मा, शाम परचुरकर, राजेंद्र राजेशिर्के, वासुदेव घाग, पुंडलिक पवार, सुहास सावंत, नामदेव पाटोळे, डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी वीर जवानांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये झोरे बापू सेनापदक विजेते, मधुसुदन सुर्वे शौर्यपदक, मनोहर सुर्वे, विनायक म्हस्के सेना पदक, बजरंग मोरे, केशव चाळके, धारु चाळके, जयवंत कदम, रामराव जाधव, रामचंद्र चव्हाण, मनोहर शिंदे, सुधीर आंबे्र, तर वीरपत्नी यामध्ये कविता जाधव, सविता कदम, यशोदा भोसले, रत्नमाला चव्हाण, गंगुबाई आंब्रे, मालती बने, शेवंतीबाई आंब्रे, मालती घाग, प्रतीक्षा कनावजे, सुनंदा मोरे, दीपाली जाधव यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कारगील दिनाचे औचित्य साधून बहादूरशेख नाका ते नगरपरिषद शिवाजी पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. (वार्ताहर)