कोराेनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:28+5:302021-09-12T04:36:28+5:30
२. चिपळूण बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि कोरोनाचा संसर्ग नियमावलींच्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नागरिकांमुळे उत्सवानंतर पुन्हा एकदा ...

कोराेनाशी लढा
२. चिपळूण बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि कोरोनाचा संसर्ग नियमावलींच्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्या नागरिकांमुळे उत्सवानंतर पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात. शासनाने मागील महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. त्यानुसार नियम व अटींच्या आधारे बाजारपेठेतील व्यवसाय पूर्वपदावर आणून अर्थचक्र रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
३. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. दरवर्षीप्रमाणे श्री गणेशाचे आगमन झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवात एक समाजिक संदेश दिला जातो. यावर्षीचा कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाचा सामाजिक संदेश संस्थेने दिला आहे. दरवर्षीप्रमाणे गणेशाची सर्व सजावट संस्थेतील मुला-मुलींनी केली आहे. गणेशाच्या आगमनामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.