कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:20+5:302021-08-15T04:32:20+5:30
२. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कनकाडी ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. गावातील ५० ग्रामस्थांनी या ...

कोरोनाशी लढा
२. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कनकाडी ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. गावातील ५० ग्रामस्थांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. या लसीकरणात दुसरा डोस असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले होते. दुसऱ्या डोसची मुदत सुरू झालेल्या सुमारे ३५ ग्रामस्थांना लसीचा लाभ देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक रेखा जाधव, कल्पना जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. सरपंच संतोष गोताड, उपसरपंच संतोष बांडागळे, सदस्य, कोतवाल श्रीरंग जाधव, नाना गराटे यांनी सहकार्य केले.
३. शहरातील बाजारपेठेत कोरोना नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्राहक तसेच वाहनांची गर्दी, मास्क वापराबाबतची उदासीनता यामुळे बाजारपेठेत दररोजची गर्दी कोरोना प्रादुर्भाव वाढीसाठी निमंत्रण देणाऱी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असला तरी, अजून कोरोनामुक्त झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढत चालल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोनाचे नियम पाळण्याची आवश्यकता असल्याची चर्चा सुरू आहे.