कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:26+5:302021-09-03T04:33:26+5:30
२. लागोपाठ दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये ...

कोरोनाशी लढा
२. लागोपाठ दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपध्दती अवलंबिण्यात आली आहे. यातून मुलांना मोबाईलची सवय लागली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले सतत मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांच्या डोळ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचे इतरही दुष्परिणाम झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
३. खेड तालुक्यात सद्यस्थितीत १३ ठिकाणी कन्टेनमेंट झोन कार्यान्वित आहेत. याठिकाणी आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यावेळी जनजागृतीवर भर देण्यात येत आह. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २२३वर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात ३१५ कोरोनाबाधित आढळले असून, ६ जणांचा कोराेनाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत तसेच मृत्यूंची संख्याही जास्त आहे.