कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:40+5:302021-09-02T05:08:40+5:30

२. कोरोनाच्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने पार पडला. शहरवासीयांनी गर्दी टाळून दहीहंडीची परंपरा जपली. ...

Fight the Corona | कोरोनाशी लढा

कोरोनाशी लढा

२. कोरोनाच्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्सव जिल्ह्यात साध्या पद्धतीने पार पडला. शहरवासीयांनी गर्दी टाळून दहीहंडीची परंपरा जपली. या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते; परंतु निवडक लोकांनी हा सन कोरोनाचे नियम पाळून साजरा केला. भजने, आरत्या म्हटल्यानंतर एका थरावरच दहीहंड्या फोडण्यात आल्या. या उत्सावासाठी कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

३. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्याचबरोबर शासनाकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत असला तरी लोकांकडून, तसेच राजकीय पक्षांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्ष कार्यक्रम घेण्यात मग्न आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यावर पाणी फेरले जात आहे.

Web Title: Fight the Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.