कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:49+5:302021-08-29T04:30:49+5:30
२. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक व कारवांचीवाडी अशी दोन महसूल गावे असून, कारवांचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणाचे ४ ...

कोरोनाशी लढा
२. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक व कारवांचीवाडी अशी दोन महसूल गावे असून, कारवांचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणाचे ४ ते ५ टप्पे झाल्याने पोमेंडी बुद्रुक येथील बौद्धवाडी, मयेकरवाडी, शिंदेवाडी, बाणेवाडी ग्रामस्थ लसीकरणापासून आतापर्यंत वंचित आहेत. त्यांना लसीकरणासाठी कारवांचीवाडी येथे दूर अंतरावर जाऊनही लस न घेताच परतावे लागत असल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
३. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनायोद्ध्यांसह पूरपरिस्थितीत मदत केलेल्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. कोरोनायोद्धा म्हणून संतोष तोडणकर, निनाद पाटील, ग्रामविकास अधिकारी सुरेश मोहिरे, आरोग्यसेविका जे. एम. शिवलकर, मदतनीस वैष्णवी पाटील आदींचा सन्मानचिन्ह, पुषपगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.