कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:58+5:302021-08-23T04:33:58+5:30
२. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी शासनाने आखलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जिल्ह्यात बाधित रुग्ण ...

कोरोनाशी लढा
२. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी शासनाने आखलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जिल्ह्यात बाधित रुग्ण कमी आढळू लागल्याने कोरोनाबाबत ठरवून दिलेले सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि सॅनिटायझर लावणे आदींचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामीण भागासह शहरामध्येही मास्क घालण्यासह सोशल डिस्टन्सिंगबाबत बेपर्वाईपणे वागले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एक प्रकारे कोरोनाला आमंत्रणच दिले जात आहे.
३. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिवारातील सर्वांचेच लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात १८ ते २९ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत हातखंबा पंचायत समिती गणात ३८० आणि पाली पंचायत समिती गणात ८१५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.