कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:20+5:302021-08-22T04:34:20+5:30
२. रत्नागिरी तालुक्यातील १८ ते २१ वर्ष वयोगटातील युवकांची लसीकरणाची मोहीम शिवसेनेकडून हाती घेण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी ...

कोरोनाशी लढा
२. रत्नागिरी तालुक्यातील १८ ते २१ वर्ष वयोगटातील युवकांची लसीकरणाची मोहीम शिवसेनेकडून हाती घेण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी शहर परिसरातील युवकांच्या लसीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचा फायदा हजारो युवकांनी घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भाग लसीकरणात मागे पडू नये, यासाठी तेथेही ही मोहीम राबविण्यात येत आहे.
३. जिल्ह्यात मासेमारी हंगाम सुरु होऊन पंधरवडा उलटला आहे. किनारपट्टीवरील भागात मोठ्या प्रमाणात मच्छीमार समाज राहतो. जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे किनारपट्टीवरील मच्छीमार कुटुंबीयांसाठीही लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी. मासेमारी सुरु झाल्याने जिल्ह्यात शेकडो खलाशी अन्य राज्य, जिल्ह्यांमधून आले आहेत. त्यांनाही लसीकरण मोहीम आयोजित केल्यास त्याचा लाभ घेता येईल.