मातृमंदिरचे शेत पुन्हा कलिंगडांनी बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:40+5:302021-03-20T04:29:40+5:30
देवरुख : मातृमंदिरने शेती विभागात अनेक प्रयोग केले आहेत. काही वर्षे या प्रयोगांची गती काहीशी कमी झाली होती. आता ...

मातृमंदिरचे शेत पुन्हा कलिंगडांनी बहरले
देवरुख : मातृमंदिरने शेती विभागात अनेक प्रयोग केले आहेत. काही वर्षे या प्रयोगांची गती काहीशी कमी झाली होती. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर मातृमंदिरने आपला ओझरे येथे सेंद्रीय कलिंगडाचा मळा फुलविला आहे. कोविडच्या भीषण परिस्थितीत गोकुळ अनाथालय, मातृमंदिर हाॅस्पिटल आदी विविध सामाजिक प्रकल्पांना काहीअंशी स्थैर्य देण्यासाठीच संस्थेने पुन्हा हे शिवधनुष्य उचलले आहे.
मातृमंदिरचे उपाध्यक्ष विलास कोळपे यांच्या संकल्पनेतून ही सेंद्रीय कलिंगडाची बाग फुलली आहे. कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला हा प्रायोगिक प्रकल्प जिल्ह्यातील युवा तंत्रस्नेही शेतकऱ्यांसाठी मॉडेल ठरला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीचा महिना कलिंगडाची बाजारातील आवक वाढणारा ठरतो, यावर्षी तर त्यात अधिकच वाढ झाली आहे.
मातृमंदिरच्या या सेंद्रिय कृषी प्रकल्पाची सुरुवातच आखीव रेखीव मलचिंग पध्दतीने करण्यात आली आहे. त्यामुळे तणनाशके आणि विविध कीटकांच्या प्रदुर्भावाच्या प्रवेशालाच अटकाव करण्यात आला. त्याचवेळी शेण खत, गांडूळ खत या नैसर्गिक खतांचा वापर यात प्रकल्पात करण्यात येत आहे. जिवांबू, वेस्ट डिकंपोझ गाझियाबाद पध्दत यात विविध डाळी वापरून तयार केलेले मायक्रोन्यूट्रियंट, लेंडी खतापासून तयार केलेले जीवाणू द्रव्य, गार्बेझ एन्झाईन : विविध टाकावू फळांपासून निर्मित केलेले द्राव (ज्याची आळवणी ही पिकाला अधिक सचेतना आणि प्रतिकारकता देते), रासायनिक खतांचा जाणीवपूर्वक टाळलेला वापर यामुळे ही फळे हायजेनिक आणि आरोग्यदायी आहेत. डायबेटीसच्या रुग्णांनीही मनसोक्त आस्वाद घेण्याजोगी अशी आहेत.
ही कलिंगडे मेलडी आणि ॲागस्टा या दोन वाणाची आहेत. काढणीनंतर ती १६ दिवस राहू शकणारी अशी आहेत. ही कलिंगडे थेट घरपोच देण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जाणार आहे.
...............................
फोटो आहे.