पर्यटन महोत्सवाला कार्यक्रमांची मेजवानी

By Admin | Updated: December 13, 2015 01:14 IST2015-12-13T00:51:56+5:302015-12-13T01:14:21+5:30

दिवाकर रावतेंना निमंत्रण : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम निश्चित

Festival of Events for the Festival of the Festival | पर्यटन महोत्सवाला कार्यक्रमांची मेजवानी

पर्यटन महोत्सवाला कार्यक्रमांची मेजवानी

सावंतवाडी : पर्यटन महोत्सवानिमित्त सावंतवाडीनगरी चांगलीच सजू लागली आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते उपस्थित राहण्याची शक्यता असून, समारोपाला कोण येणार हे अद्याप ठरले नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
गेली आठ वर्षे सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे नेटके आयोजन करण्यात येते. महोत्सवानिमित्त विविध कलाकार सावंतवाडीत येत असतात. गेल्यावर्षीपासून सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून, पर्यटन महोत्सवाची सुरूवात करणारे दीपक केसरकर हे राज्याच्या मंत्रीमंडळात अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री आहेत. मात्र, यावर्षी २३ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पर्यटन महोत्सवाला उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यांचे येणे अद्याप निश्चित नाही. त्यांच्यासोबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हेही असणार आहेत. तर समारोपाच्या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करायचे हे निश्चित नसून, यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना प्रसिध्द् कलाकारांना आणण्याचे ठरवण्यात आले आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे दोघे कलाकारांच्या संपर्कात असून, नगराध्यक्ष साळगावकर यांनी शुक्रवारी सकाळी चित्रपट सेनेचे प्रमुख आदेश बांदेकर यांची भेट घेतली. याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, अद्यापपर्यंत पाच दिवसांचे कार्यक्रम ठरले नसले, तरी आम्ही कलाकारांच्या संपर्कात आहोत. त्यातील बरेच कलाकार हे ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्त अन्यत्र जाणार असल्याने आम्हाला वेळ मिळत नाही, असे तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
गैरहजर : शंकर महादेवनांची प्रकृती बिघडली
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी विविध कार्यक्रमांची रुपरेषा आखण्याचे काम सुरु आहे. याचदरम्यान, वर्षअखेर असल्याने अनेक कलाकार व्यस्त आहेत. गायक शंकर महादेवन यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी येण्याचे मान्यही केले होते. पण आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते येणार नसल्याचे उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सांगितले.

Web Title: Festival of Events for the Festival of the Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.