कर्णबधिर मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी वडिलांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:58+5:302021-05-12T04:32:58+5:30
दापाेली : मंडणगड एसटी़ आगारात चालकाचे काम करणाऱ्या गोविंद शेषेराव फड यांची साडेतीन वर्षांची मुलगी कर्णबधिर आहे. तिच्यावर काॅक्लिआ ...

कर्णबधिर मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी वडिलांचे आवाहन
दापाेली : मंडणगड एसटी़ आगारात चालकाचे काम करणाऱ्या गोविंद शेषेराव फड यांची साडेतीन वर्षांची मुलगी कर्णबधिर आहे. तिच्यावर काॅक्लिआ इंप्लान्ट शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी आठ लाख रुपये इतका खर्च आहे. हा खर्च तिच्या वडिलांना न परवडणारा असून, त्यासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
गोविंद शेषेराव फड (मु. बोरीचामाळ, भिंगरोळी, ता.मंडणगड) येथील रहिवासी आहेत. त्यांची साडेतीन वर्षांची मुलगी गौरी गोविंद फड ही कर्णबधिर आहे. तिला काही ऐकू येत नाही आहे. त्यामुळे ती बोलू शकत नाही आहे. जर तिला चांगल्या प्रकारचे श्रवणयंत्र लावले, तर ती चांगल्या प्रकारे आवाज ऐकू शकेल? आणि तिला बोलण्याचे प्रशिक्षण दिले, तर ती बोलू शकेल, तसेच तिचे कॉक्लिआ इंप्लान्ट सर्जरी केली, तर चांगल्या प्रकारे आवाज ऐकू शकेल. तिला बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यावर ती चांगल्याप्रकारे बोलू शकेल, यासाठी आठ लाख इतका अपेक्षित आहे. मात्र, त्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.