काेत्रेवाडी ग्रामस्थांचे आज उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:08+5:302021-08-15T04:32:08+5:30
लांजा : लांजा नगरपंचायतीतर्फे जबरदस्तीने कोत्रेवाडी येथे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर ...

काेत्रेवाडी ग्रामस्थांचे आज उपाेषण
लांजा
: लांजा नगरपंचायतीतर्फे जबरदस्तीने कोत्रेवाडी येथे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाविरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदार, नगरपंचायत व पोलीस स्थानक यांना देण्यात आले आहे.
निवेदनात कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी म्हटले आहे की, लांजा नगरपंचायतीतर्फे कोत्रेवाडी येथे राबविण्यात येणाऱ्या घनकचरा अर्थात डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही प्रशासन कोत्रेवाडीमध्येच भर लोकवस्तीलगत घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी आग्रही आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून हा प्रकल्प रेटून नेण्यासाठी नगरपंचायत आणि सत्ताधारी शिवसेना प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोणत्याही नियमांमध्ये ही प्रस्तावित जागा बसत नसून प्रशासनाकडे अन्य दोन जागांचे पर्यायी प्रस्ताव असतानाही कोत्रेवाडी येथील परिपूर्ण नसलेल्या जागेबाबत नगरपंचायतीचा अट्टाहास का, असा प्रश्न ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. निवेदनावर कोत्रेवाडीतील सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत.