शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

आरजीपीपीएल विरोधात उपोषणाचा इशारा

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

कामगारांनी अशाप्रकारच्या डावपेचांना बळी न पडता ऐक्य कायम ठेवत न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला.

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील सी अ‍ॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत दि. २३ मार्चपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅण्ड मटेरियल फायनान्स विभागाच्या कामगारांना याबाबतचे लेखी निवेदन कंपनी प्रशासन तसेच पोलीस निरीक्षक गुहागर यांना दिले आहे. हे कामगार गेली सहा वर्षे कंपनीत कार्यरत आहेत. दरम्यान ठेकेदार बदलत राहिले तरीही हे कामगार कंपनीत सतत काम करत आहेत. दि. १ मार्च २०१५ पासून या कामाचा ठेका मेसर्स के . डॅनियल यांना मिळाला. ठेकेदार नेमण्याचे काम युटीलीटी पॉवर लि. (युपीएल) या मुख्य ठेकेदार कंपनीमार्फत होते. मात्र कंपनी प्रशासनाने हस्तक्षेप करत मेसर्स के. डॅनियल या ठेकेदारला ठेका मिळालेला असताना त्यांना वर्क आॅर्डर दिली नाही. परस्पर दोन महिन्यांसाठी नवीन निविदा काढून नव्या ठेकेदारामार्फत नवीन माणसे घेण्याचा घाट घातला. त्यानंतर काही कामगारांना वगळण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, कामगारांनी अशाप्रकारच्या डावपेचांना बळी न पडता ऐक्य कायम ठेवत न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला. याप्रकरणी प्रशासनाचा निषेध करत न्याय हक्कांसाठी व सर्वांना कामावर घ्यावे या मागणीसाठी दि. २३पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)