पावसाची शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणीच
By Admin | Updated: July 6, 2014 01:03 IST2014-07-06T01:00:31+5:302014-07-06T01:03:33+5:30
लावणीच्या कामांना अजूनही गती नाही

पावसाची शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणीच
रत्नागिरी : महिन्याभराची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने हजेरी लावली असली, तरी अजूनही त्याचा लपाछपीचा खेळ सुरूच असल्याने लावणीच्या कामांना अजूनही गती आलेली नाही. जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनचा पाऊस जूनची कसर भरून काढेल, ही आशाही आता धूसर होऊ लागली आहे.
जून महिना कोरडा गेल्याने निदान जुलैच्या प्रारंभापासून तरी चांगली सुरुवात करेल, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटत होता. त्यामुळे बुधवारी (दि. ३) पावसाची सुरुवात झाल्याने आता तरी दिलासा मिळण्याची आशा होती. मात्र, गुरुवारपासून किरकोळ सरीच पडत असल्याने अजूनही लावणीची कामे खोळंबलेलीच आहेत. (प्रतिनिधी)