नातूवाडीचे पाणी बंद केल्याने शेतकरी संकटात
By Admin | Updated: May 14, 2014 00:27 IST2014-05-14T00:27:08+5:302014-05-14T00:27:26+5:30
श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

नातूवाडीचे पाणी बंद केल्याने शेतकरी संकटात
श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाकडे केवळ ३ टँकर्स आहेत. त्यातच खेड शहराला नातूवाडी धरणातून करण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने आणखी एक समस्या उभी राहिली आहे. या गावांना पाणीपुवठा करणार्या नातूवाडी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने धरणातील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर खेड शहरासाठी याच धरणातून दररोज उपसा होणारे ३० लाख लीटर पाणी आता बंद करण्यात आले आहे. या धरणातून केवळ दुबार शेती करणार्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त गावांसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करता यावा, याकरिता धरण प्रशासनाने १५ टक्के पाणी आरक्षित ठेवल्याची माहिती नातूवाडी प्रकल्पाचे उपअभियंता पी़ चिदंबरम यांनी दिली. नातूवाडी प्रकल्पाअंतर्गत १७ गावांतील शेतजमीन ओलिताखाली आहे. याकरिता धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणी क्षमता १२८ दशलक्ष घनमीटर आहे, तर सध्या पाणीसाठी केवळ ५५ दशलक्ष घनमीटर आहे. दुबार शेती करणार्यांना यातील पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी कमी झाले आहे. यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याकरिता १५ टक्के पाणीसाठा आरक्षित केल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. ५५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी हे पाणी आरक्षित करण्यात आल्याने खेड शहरासाठी दररोज पुरवण्यात येणारे ३० लाख लीटर पाणी बंद करण्यात आले आहे. धरण प्रशासनाने याविषयी नगरपालिका प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, नातूवाडी धरण प्रशासनाने पाणी सोडणे बंद केल्याने नगरपालिकेने खोपी धरण प्रशासनाला पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे खेड नगरपालिकेला खोपी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. नातूवाडी धरणातील हे पाणी सध्या ज्या कालव्यातून दुबार शेतीसाठी पुरविले जात आहे. त्याच कालव्यातील पाणी सध्या सुकिवली येथील चोरद नदीत जमा होत असल्याने या नदीतील पाणी सध्या तालुक्यातील टंचाईगस्त गावांना व वाड्यांना टँकरद्वारे पुरविले जात आहे़ यापूर्वी शिरवली धरणातील पाणी काहीअंशी या नदीला पुरविले जात असे. आता शिरवली हे धरण नादुरूस्त आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्रासपणे नातूवाडी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शिवाय यापुढे तालुक्यात भीषण टंचाई जाणवल्यास याच धरणातील पाणी पुरवण्यात येणार असल्याची माहीती चिदंबरम यांनी दिली आहे़