धर्मराज्य शेतकरी संघटनेची २६ रोजी शेतकरी परिषद
By Admin | Updated: January 21, 2015 21:50 IST2015-01-21T21:49:59+5:302015-01-21T21:50:13+5:30
या परिषदेला ५०० शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत

धर्मराज्य शेतकरी संघटनेची २६ रोजी शेतकरी परिषद
रत्नागिरी : धर्मराज्य शेतकरी संघटनेने
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी
काजिर्डा, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
येथे ‘प्रकल्प शेतकरी परिषद’
आयोजित केली आहे. या परिषदेत
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-
पाटील, धर्मराज्य शेतकरी संघटनेचे
अध्यक्ष राजन राजे उपस्थित राहणार
असल्याची माहिती ‘धर्मराज्य शेतकरी
संघटने’चे महासचिव अनिल ठाणेकर
यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर
तालुक्यातील काजिर्डा - राणेसाठी
गावात ‘जामदा’ नदीवर जामदा मध्यम
पाटबंधारे प्रकल्पाचे काम गेली १९ वर्षे
सुरु आहे. यादरम्यान प्रकल्पाचा
खर्च ४५ कोटींवरुन तब्बल ५००
कोटींवर गेला आहे. परंतु अजूनही
बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या काजिर्डा-
राणेवाडीसह सात वाड्यांसाठी
कोणतीही ‘पुनर्वसन योजना’
आखण्यात आलेली नाही. परंतु
ग्रामस्थांना प्रकल्पाच्या नावाखाली
हुसकावून लावण्याचे प्रयत्न होत
आहेत. असेच प्रकार रत्नागिरी
जिल्ह्यात अर्जुना - अरुणा -
कळसवली - गड - शेलारवाडी-
पोयनार - नातूनगर प्रकल्पातील
शेतकऱ्यांबाबत होत आहे. याचा
निषेध करण्यासाठी २६ जानेवारी रोजी
प्रजासत्ताक दिनी काजिर्डा, ता. राजापूर
येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद
आयोजित करण्यात आली आहे. या
शेतकरी परिषदेत माजी न्यायमूर्ती बी.
जी. कोळसे - पाटील, धर्मराज्य
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजन राजे
उपस्थित राहतील, तसेच या परिषदेला
५०० शेतकरी प्रतिनिधी उपस्थित
राहणार आहेत, असेही अनिल ठा