जिल्ह्यात शेततळ्याचे काम शून्य
By Admin | Updated: October 12, 2014 00:51 IST2014-10-12T00:50:46+5:302014-10-12T00:51:52+5:30
मग्रारोहयो : २४७ शेततळी बांधण्याचे उद्दिष्ट कागदावरच

जिल्ह्यात शेततळ्याचे काम शून्य
रत्नागिरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत जिल्ह्यात २४७ शेततळी बांधण्यासाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ मात्र, अर्धे वर्ष उलटले तरी जिल्ह्यात एकही शेततळीचे काम करण्यात आलेले नाही़
मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ या योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, सामूहीक शेततळे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे आदी कामे वृक्ष लागवड व शेतीसाठी घेण्यात येतात़ त्यामुळे बारमाही शेती करण्याच्या दृष्टीने शेततळीचा वापर करता येऊ शकते़ त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यासाठी जिल्ह्यात २४७ शेततळीची कामे घेण्यात येणार होती़ त्यासाठी सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये जिल्ह्यात २४७ कामांसाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ सन २०१४-१५ च्या मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये कोटीची उड्डाणांचे कागदावर नियोजन करण्यात आले असले तरी एकही काम नाही़ त्यामुळे योजनेचा आराखडाही कागदावरच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे़ (शहर वार्ताहर)
तालुकागाव तळींची कामे
मंडणगड ०१
दापोली २१
खेड ६७
चिपळूण ६८
गुहागर १२
संगमेश्वर १६
रत्नागिरी ००
लांजा २०
राजापूर ४२
एकूण२४७