कृषिसेवकाला उपसरपंचाची धमकी
By Admin | Updated: July 28, 2015 23:51 IST2015-07-28T23:51:12+5:302015-07-28T23:51:12+5:30
नाखरे येथील प्रकार : कारवाई करण्याची मागणी

कृषिसेवकाला उपसरपंचाची धमकी
पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावचे कृषिसेवक श्याम ज्ञानदेव माळशिकारे यांना नाखरे येथील उपसरपंचांनी धमकावल्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे.आंबा नुकसानाच्या यादीत शिल्लक राहिलेली नावे समावेश करण्याकरिता ग्रामपंचायत नाखरे येथे बोलावून उर्वरित नावे यादीमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी माळशिकारे यांनी हे काम माझे एकट्याचे नसून ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक व सहाय्यकांनी संयुक्तपणे काम करायचे आहे. त्यानंतर तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कामांमुळे तूर्तास येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतरही माळशिकारे यांना जोपर्यंत तलाठी येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही, असे उपसरपंचाने धमकावले. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य कृ षी सहाय्यक संघटना, रत्नागिरी शाखेतर्फे संबंधितांवर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत योग्य कारवाई करण्यात आली नाही तर आंबा नुकसानाच्या संगणकीकृत याद्या करण्याचे काम स्थगित करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.सर्व कृषी सहाय्यक, सेवक हे आंबा नुकसानाच्या संगणकीकृ त याद्या तयार करीत होते. त्यावेळी उपसरपंच, नाखरे यांनी या सजाचे कृषिसेवकश्याम माळशिकारे यांना फोन करुन यादीत शिल्लक राहिलेली नावे समावेश करण्याकरिता ग्रामपंचायतीत बोलावण्यात आले. माळशिकारे हे २३ जुलै रोजी नाखरे येथे गेले. त्यावेळी उपसरपंचांनी नाखरे गावातील आंबा नुकसानाची उर्वरित नावे यादीमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला.
उपसरपंचांनी कृषिसेवकांना संबंधित तलाठ्यांना बोलावून घेण्यास सांगितले. त्यावेळी कृषिसेवकांना तलाठ्यांनी येणे शक्य नाही, असे दूरध्वनीवरुन सांगितले. त्यानंतर उपसरपंच नाखरे ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरुन तहसीलदार, रत्नागिरी यांना फोन करण्यास सांगितले.
त्यानंतरही कृषिसेवकांनी हे काम सर्वस्वी कृषी विभागाचेच आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात पंचनाम्याचे काम संयुक्त असून, नैसर्गिक आपत्ती संबंधितचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना याप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनामे करण्यासंबंधी आदेश देणे आवश्यक आहे. त्यानुसारच तिन्ही यंत्रणा मिळून संयुक्त पंचनामे होणे आवश्यक आहेत, असे सांगितले. केवळ कृषी विभागाची जबाबदारी नाही, असे आमचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतरही माळशिकारे यांना जोपर्यंत तलाठी येत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नही, असे धमकावले. त्यांच्या गाडीची चावी, लॅपटॉपसह दप्तराची बॅग काढून घेतली. त्यानंतर माळशिकारे यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावर जिल्हा अधीक्षक कृषी यांनी तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी यांच्रामार्फ त माळशिकारे यांना एस. टी. बसने रत्नागिरी कार्यालयास निघून येण्यास सांगितले. त्यावेळी उपसरपंचांनी सर्व साहित्य माळशिकारे यांना परत केले, असे निवेदनात म्हटले आहे.
मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठीच त्यांना त्वरित नुकसानभरपाई प्राप्त होण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामा यादी संगणकीकृत करुन देत आहोत. मात्र, अशा प्रकारे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना धमकी व इतर मानसिक त्रास होत असेल तर काम करताना अत्यंत कठीण होत आहे.
कृषी सेवक माळशिकारे यांना दिलेल्या धमकीबद्दल संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी. अन्यथा आंबा नुकसानाच्या संगणकीकृ त याद्या करण्याचे काम स्थगित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, रत्नागिरी अध्यक्ष रघुनाथ डबरी यांनी सांगितले. या साऱ्या प्रकाराबाबत कृषी संघटनेने निवेदन दिल्यानंतर आता पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांची यादी
कोकणात यंदा आंबा नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. या नुकसानभरपाईसाठी आवश्यक नावे यादीत समाविष्ट करण्याचे काम सुरू.
तलाठी येत नाहीत तोपर्यंत जाऊ न देण्याची धमकी दिल्याप्रकरणी कृषी सहाय्यक संघटनेतर्फे निवेदन.
आंबा नुकसानाच्या शिल्लक नावांची नोंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार गंभीर.
आपत्कालिन परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनामे करण्याचे आदेश.