आरोग्य उपकेंद्रांना भाड्याच्या जागेची बाधा
By Admin | Updated: October 21, 2015 23:34 IST2015-10-21T23:34:36+5:302015-10-21T23:34:36+5:30
राजापूर तालुका : सोयीसुविधा अद्याप अपुऱ्याच

आरोग्य उपकेंद्रांना भाड्याच्या जागेची बाधा
राजापूर : स्वमालकीची इमारत नसल्याने तालुक्यातील १८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे. हे कामकाज स्वत:च्या जागेतून केव्हा हाकणार, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
राजापूर तालुक्यात सध्या आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य उपकेंद्रांचीही तशीच अवस्था आहे. अनेक उपकेंद्रांना स्वत:च्या इमारती नसल्याने अनेक समस्यांचा सामना करतच रुग्णांना सेवा द्यावी लागत आहे. आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचा प्रश्न आजवर अनेकवेळा शासनदरबारी मांडण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
यामध्ये ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ओणी, चुनाकोळवण, खरवते, करक, कारवलीअंतर्गत करक, परूळे, तळवडे, फुफेरेअंतर्गत आंगले, दोनिवडे, तुळसवडे, जवळेथरअंतगत काजिर्डा, कुंभवडेअंतर्गत सागवे जैतापूरअंतर्गत साखर, पडवे, डोंगर, सोलगावअंतर्गत देवाचेगोठणे धारतळेअंतर्गत कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ या गावांचा समावेश आहे.
या सर्व उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्या जागेतून चालतो, अशा इमारती बांधण्यासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध असावी लागते. तथापि जागेचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळेच ही अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याने आणि लोकप्रतिनिधी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न भिजत पडला आहे. शासनाने लवकरात लवकर उपकेंद्रांच्या स्वमालकीबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)

राजापुरातील १८ आरोग्य उपकेंद्र ही नजीकच्या अनेक गावांसाठी उपयुक्त आहेत. दरदिवशी हजारो रुग्ण याठिकाणी उपचार घेतात. मात्र, त्याठिकाणी अनेक समस्या असल्याने यापेक्षा खासगी रुग्णालयांचा आधार घेतलेला बरा, अशी इच्छा अनेक रुग्ण बोलून दाखवत आहेत.
पुढाऱ्यांचे दुर्लक्ष
राजकीय नेते या आरोग्य उपकेंद्रांकडे फिरकतही नाहीत. या पुढाऱ्यांपैकी कुणी आजारी असले तर ते खासगी रुग्णालयाचा आधार घेतात. त्यामुळे त्यांना सामान्यांच्या वेदना काय कळणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.