शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा चिरेबंदी वाडा पोरका झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:57 IST

गणेश उत्सव, शिमगा उत्सव या दोन सणासाठी ते आवर्जून आपल्या गावात येत

शिवाजी गोरेदापोली : कोकणाबाहेर गेलेल्या प्रत्येक कोकणी माणसाला आपल्या गावात एखादं टुमदार घर बांधण्याचं स्वप्न असतं. आयुष्यभर भव्यदिव्य स्वप्न पाहिलेल्या आणि ती सत्यात उतरवलेल्या नितीन देसाई यांनीही असं स्वप्न पाहिलं आणि आपल्या मूळ गावी, दापोली तालुक्यातील पाचवली येथे चिरेबंदी वाडा बांधला. त्याचं हे स्वप्न तर पुर्ण झालं. पण आपल्या गावात एक स्टुडिओ उभारण्याचं मात्र राहूनच गेलं. आता त्यांच्या अचानक आणि धक्कादायक मृत्यूनंतर ग्रामस्थ त्यांच्या आठवणींनी शोकाकुल झाले आहेत.कलादिग्दर्शन रक्तातच भिनले असल्याने देसाई यांनी आपले पाचवलीतील घरही देखण्या पद्धतीने उभारले. आंगण , पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाक खोली, बेडरूम, पोट माळा, पडवीत बसण्याची व्यवस्था, तसेच कोकणी पद्धतीची चूल अशी घराची रचना असलेले कोकणी पद्धतीचे जाब्या दगडांनी बांधलेले लाकडी, फळ्या, लाकडी खांब, लाकडी जिना, असा कोकणी पद्धतीचा वाडा चिरेबंदी त्यांनी बांधला होता. या घरात दिवांत क्षण घालवण्यासाठी ते येत असत. जून महिन्यात शेवटचं ते याच घरात येऊन राहून गेले मात्र त्यांची ही शेवटचीच आठवण ठरली.कोकणातील उत्सव म्हणजे गणेश उत्सव, शिमगा उत्सव या दोन सणासाठी ते आवर्जून आपल्या गावात येत असतात त्यावेळी दोन-तीन दिवस आपल्या स्वप्नातील घरात म्हणजेच वाडा चिरेबंदी राहत असत. आजोबा, वडील, काका, भाऊ, आणि मुले चार पिढ्या एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे देसाई मंडळी एकत्रच सण उत्सव साजरे करत.वडील नोकरी निमित्त मुंबईत असल्याने त्यांचे वास्तव्य मुंबईत होते तरीही त्यांनी गावाची नाळ जुळवून ठेवली होती. आपल्या गावात कोकणी पद्धतीचा वाडा असावा, सुंदर मंदिर असावं असं त्यांचं स्वप्न होतं गावात मारुतीचं सुंदर मंदिर त्यांनी उभं केलं, कोकणी पद्धतीचा वाडा चिरेबंदी उभा केला. गावदेवीच्या मंदिराच्या कामालाही सुरुवात झाली, मात्र आपल्या गावात एक स्टुडिओ असावा असे त्यांचे स्वप्न होते हे स्वप्न मात्र अधुरे राहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाई