बचत गटांतर्फे कन्येचे स्वागत
By Admin | Updated: March 25, 2016 00:05 IST2016-03-24T22:13:03+5:302016-03-25T00:05:39+5:30
सुवर्णवाडी येथील नवजात दोन कन्यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन

बचत गटांतर्फे कन्येचे स्वागत
जैतापूर : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील बचत गटांच्या महिलांनी नवजात कन्येचे स्वागत करत सामाजिक उपक्रम राबविला.चैतन्य संस्था, पुणेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांचे या महिला आयोजन करत असतात. मिठगवाणे येथे कार्यरत बचतगट गावविकास समितीच्या माध्यमातून गावात नवजात कन्येच्या स्वागताचा कार्यक्रम केला जातो. यावेळी सुवर्णवाडी येथील नवजात दोन कन्यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बचत गटांच्या महिलांनी या कन्यांच्या घरी जात भेटवस्तू देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला चैतन्य ग्रामीण महिला युवक व बालविकास संस्था, राजगुरूनगर, पुणेच्या लोकसंचलित साधन केंद्र, राजापूरचे व्यवस्थापक राजन लाड, जागृती गावविकास समितीच्या अध्यक्षा वसुधा पावसकर, दीपाली कुवेसकर, प्रणिता नेवरेकर, मनिषा जैतापकर, विजया पावसकर, सुजल पावसकर, प्रमिला पावसकर, प्रभावती जैतापकर, शारदा आडिवरकर, विजया पाससकर, कल्पना कुवेसकर, शुभांगी जैतापकर, आदींसह श्री गणेश, महापुरूष, वैभवलक्ष्मी, रिध्दी-सिध्दी, आदींसह गावस्तरीय समितीच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. (वार्ताहर)