फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले

By Admin | Updated: July 11, 2016 00:42 IST2016-07-11T00:42:32+5:302016-07-11T00:42:32+5:30

लोवले गाव हळहळला : अजयचं कुटुंब झालं पोरकं

The family members of the crackers failed | फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले

फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले

सचिन मोहिते ल्ल देवरुख
आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी सेंट्रिंगचे काम स्वीकारले होते. या कामावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच विचार चालला होता. संगमेश्वर तालुक्यातील कुरूधुंडा येथील शौचालयाच्या टाकीचे काम करताना गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये लोवले फटकरेवाडीतील ‘त्या’ फटकरे कुटुंबियांचे कर्तेच हरपले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अजय फटकरे यांचा अवघ्या दोन वर्षांचा लहानगा त्यांच्या जाण्यामुळे पोरका झाला आहे तर अशोक फटकरे यांच्या मुलाला अकरावीपासून पुढील शिक्षणाचा खर्च आता स्वत:लाच करावा लागणार आहे.
कुरुधुंडा गावात घेतलेले काम शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि केवळ शौचालयाच्या टाकीच्या स्लॅबच्या फळ्या काढण्यासाठी त्या टाकीत उतरलेल्या तिघांना प्राणाला मुकावे लागले. वीस फूट खोल असणाऱ्या या टाकीत गुदरमल्याने ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी १० च्या सुमारास घडली होती. या टाकीचे काम हे नजीर मुजावर यांनी घेतले होते. त्यांच्याकडे फटकरे हे काम करत असत. अशोक फटकरे हे स्वत:देखील छोटी-मोठी कामे घेत असत. त्यांच्याकडे अजय फटकरे हा कामगार म्हणून काम करत असे. नजीर मुजावर आणि अशोक फटकरे हे कामात एकमेकांना सहकार्य करत असत.
अशोक फटकरे (४०) हे आपली रोजीरोटी सेंट्रिंग व्यवसायावरच चालवत होते. मात्र, त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, ११ वीत शिकत असलेला एक मुलगा आणि बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषच हरपल्याने कुटुंबियांचा आधारच निखळला आहे.
अशोक फटकरे यांच्याबरोबर गेली तीन-चार वर्षे अजय फटकरे काम करत होता. अजय फटकरे (३०) याला सार्थक नावाचा एक लहानगा मुलगा असून, तो पहिली इयत्तेत शिकत आहे. सार्थक हा निरागस वयातच पोरका झाला आहे. अजय हा आपल्या आई-वडिलांसह छोट्याशा घरात राहात होता. त्याने नवीन घरासह कुटुंबियांसाठी मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र, ती स्वप्ने आता अपूर्णच राहिली आहेत.

Web Title: The family members of the crackers failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.