पाेलीस अधीक्षकांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:32+5:302021-05-05T04:51:32+5:30

रत्नागिरी : सायबर इहसासद्वारे जनतेची सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी जनजागृती करणाऱ्या रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने ...

Fake Facebook account in the name of Paelis Superintendent | पाेलीस अधीक्षकांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट

पाेलीस अधीक्षकांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट

रत्नागिरी : सायबर इहसासद्वारे जनतेची सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी जनजागृती करणाऱ्या रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याच नावाने फेसबुकवर फेक अकाउंट काढल्याची माहिती पुढे आली आहे.

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तसेच त्यातून फसवणुकीचे प्रकारही वाढीस लागले आहेत. फेक अकाउंट काढून लोकांना फसविले जात आहे. याचा फटका खुद्द रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनाही बसला आहे. त्यांच्या नावाने कोणीतरी फेक फेसबुक अकाऊंट काढल्याचे साेमवारी उघड झाले आहे.

याबाबत सावध झाल्यानंतर, त्या नावाने जर रिक्वेस्ट आली तरी कोणीही ॲक्सपेट करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा व सोशल मीडियावर काही गैरप्रकार आढळला तर रत्नागिरी सायबर सेलच्या ८८८८९०५०२२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Fake Facebook account in the name of Paelis Superintendent