मास्क न लावणाऱ्या चाैघांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:34+5:302021-05-25T04:35:34+5:30
रत्नागिरी : कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा संभव असल्याचे माहीत असतानाही स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी ...

मास्क न लावणाऱ्या चाैघांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी : कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा संभव असल्याचे माहीत असतानाही स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरकरवाडा बंदर, भाट्ये बीच आणि रेल्वे स्थानक फाटा याठिकाणी रविवार, २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत करण्यात आली.
शहनाज आलमगिर मुकादम (४८, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) रेहान महंमद हुसेन (२१), ताजुद्दीन गौसफकीर रिफाई (२१, दाेघे रा़ क्रांतीनगर, रत्नागिरी) आणि सिध्देश अनंत गोरे (२७, रा. संजीवनी नगर, गोळप, रत्नागिरी) अशी कारवाई करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या चारजणांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही स्वतःच्या तोंडाला मास्क लावलेले नव्हते. त्यांनी हयगयीचे कृत्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.