शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:20 IST

उर्दू शिक्षक संघटना फुटीच्या उंबरठ्यावर?

रत्नागिरी : संघटनेविरोधात भूमिका घेतल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक नेते प्रकाश काजवे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शुक्रवारी (२३ जून) पत्रकार परिषदेत जाहीर केले. काजवे यांच्याबरोबर समितीचे दापोली तालुकाध्यक्ष जावेद शेख, गुहागरचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष येलकर यांची हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेवेळी समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शिक्षक विजय पंडित, बळीराम मोरे, दिलीप महाडिक, अरविंद जाधव, अंकुश गोकणे, विलास जाधव, रुपेश जाधव,  संतोष पावणे व अन्य शिक्षक नेते उपस्थित होते.  रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूक पंचवार्षिक निवडणूक २३ जुलै रोजी होत आहे.  या निवडणुकीत  शिक्षक समितीबरोबर पदवीधर शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, अखिल शिक्षक संघ आणि शिक्षक सेना या संघटना महायुतीच्या माध्यमातून एकत्रित आल्या आहेत.तसेच या निवडणुकीत पाच संघटना एकजुटीने १६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत.  त्यामध्ये  शिक्षक समिती ११, पदवीधर शिक्षक संघटना दाेन, अखिल शिक्षक संघ एक, उर्दू शिक्षक संघटना एक आणि शिक्षक सेना एक असे जागा वाटप केले आहे.काेरगावकर यांनी सांगितले की, शिक्षक समिती ही लोकशाही मार्गाने चालणारी संघटना आहे. काजवे हे विरोधी संघटनांबरोबर हातमिळवणी करून त्यांनी संघटनेच्या विरोधात काम केले. त्यांच्या मनाप्रमाणे संघटना चालणार नाही. त्यांची भूमिका संघटनेच्या विरोधात राहिल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे ते म्हणाले.

उर्दू शिक्षक संघटना फुटीच्या उंबरठ्यावर?प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत उर्दू शिक्षक संघटनेमध्ये महिला उमेदवारावरून वाद निर्माण झाला होता.  काही पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवारास विरोध करून पुरुष उमेदवार द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, उर्दू शिक्षक संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला उमेदवार देण्याचे जाहीर केले. त्यामुळे ही संघटना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक