शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोटे औद्योगिक वसाहतीत पुन्हा स्फोट, १० कामगार होरपळले; वसाहत बनतेय मृत्यूचा सापळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:50 IST

काही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता.

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्फोटाने हादरली. औद्योगिक वसाहतीतील डीवाइन रासायनिक कंपनीत सॉलवंट रसायनाने पेट घेतल्याने आग लागून हा स्फोट झाला. यामध्ये १० कामगार होरपळले आहेत. जखमींपैकी सातजणांची प्रकृती गंभीर असून, त्यापैकी पाचजणांना ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.लोटे औद्योगिक वसाहतीतील डीवाइन रासायनिक कंपनी २००७ पासून कार्यरत आहे. कंपनीत लेदर उत्पादनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन घेतले जाते. रविवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात फेब्रिकेशनचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक वेल्डिंगच्या पडलेल्या ठिणगीमुळे कंपनीतील सॉलवंट केमिकलने पेट घेतला आणि कारखान्यात धमाका झाला. या दुर्घटनेत कारखान्यात कार्यरत असलेले दहा कामगार होरपळून निघाले. जखमींमध्ये घाणेखुंट, मुसाड, लोटे येथील कामगारांचा समावेश आहे. त्यातील सातजणांची प्रकृती गंभीर असून, पाचजणांना ऐराेली येथे दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर चिपळुणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.स्फोटाच्या आवाजाने अन्य कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी डीवाइन कंपनीकडे धाव घेतली. व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती देतातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर डीवाइन कंपनीच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवून कंपनीच्या परिसरात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

वसाहत बनतेय मृत्यूचा सापळाकाही महिन्यांपूर्वी येथील एका मोठ्या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन पाचजणांचा बळी गेला होता. त्याआधीही येथील कारखान्यांमध्ये कामगारांचे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये बळी गेले आहेत. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहत कामगारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

यापूर्वीच्या दुर्घटना

  • २०१० - व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनी सुरू असताना स्फाेट. व्यवस्थापकाचा बळी.
  • ११ जानेवारी २०२० - व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनीला आग. (कंपनी बंद)
  • ७ मार्च २०२० - नंदादीप केमिकल कंपनीत स्फाेट.
  • २० सप्टेंबर २०२० - एक्सल इंडस्ट्रीजमध्ये स्फाेट.
  • जानेवारी २०२१ - दुर्गा फाईन कंपनीत स्फाेट.
  • जानेवारी २०२१ - लासा सुपरजेनेरिक (जुनी उर्धवा केमिकल)च्या घनकचऱ्याला आग.
  • २०२१ - श्रेयस इंटरमिडीएटस (आताची केसर पेट्राे)च्या गाेडावूनला आग.
  • १५ मार्च २०२१ - सुप्रिया लाईफसायन्स कंपनीत आग, दाेन कामगार भाजले.
  • २० मार्च २०२१ - घरडा केमिकल कंपनीत स्फाेट, पाच कामगारांचा मृत्यू.
  • १९ एप्रिल २०२१ - समर्थ इंजिनअरिंग कंपनीत स्फाेट व आग, सहा कामगारांचा मृत्यू.
  • २९ एप्रिल २०२१ - एमआर फार्मा कंपनीत आग.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग