शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनमुळे तो करार रद्द झालेला नाही- अनंत गीते यांचे चिपळूण येथे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:18 IST

अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे.

ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाहीचिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाल्याची ओरड चुकीची १० टप्प्यांमध्ये रेल्वेमार्ग होणार असून, १४ पुलांचे काम सुरु

चिपळूण : अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते गुहागर व चिपळूण येथील शिवसेनेच्या कार्यक्रमानिमित्ताने आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्याच ठेकेदारांवर सोपवली आहे.

ठेकेदारांनी योग्य पद्धतीने काम न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असून, याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. १० टप्प्यांमध्ये हे काम होणार असून, १४ पुलांचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१८पर्यंत झारापपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले असेल, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये बाधित झालेल्या भूधारकांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक यांच्या सहकार्यातून योग्य तो मोबदला दिला जाईल. निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. आतापर्यंत ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे रिफायनरी प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRatnagiriरत्नागिरी