भंगार वाहनांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:26+5:302021-09-12T04:36:26+5:30

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर बसस्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून आरटीओनी कारवाई केलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर खच पडला आहे. विशेष म्हणजे ...

Expenditure on scrap vehicles | भंगार वाहनांचा खच

भंगार वाहनांचा खच

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर बसस्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून आरटीओनी कारवाई केलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणावर खच पडला आहे. विशेष म्हणजे त्यात भर म्हणून आणखी कारवाईची वाहने उभी केली जात आहेत. या भंगार वाहनांना सद्यस्थितीत झाडाझुडपांनी वेढले आहे.

खवटी हायस्कूलमध्ये लसीकरण

खेड : तालुक्यातील खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व पी. के. दरेकर कनिष्ठ महाविद्यालयात लसीकरण पार पडले. ७० नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला. याप्रसंगी तळे येथील आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेविका, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

गुटखा विक्री सुरूच

रत्नागिरी : शहरात गुटखा पानमसाल्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाकडून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस छापे घालण्यात आले होते. या कारवाईमध्ये गुटखाही जप्त करण्यात आला होता. तरीही पुन्हा शहरामध्ये गुटखा विक्री जोरात सुरू आहे.

बिबट्याचे दर्शन

खेड : तालुक्यातील मोरवंडे-पिंपळवाडी येथे मानवी वस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या संचारामुळे ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास धजावत आहेत. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी

रत्नागिरी : शहरात मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही केवळ दिखाव्यापुरती केली जाते. दोन-चार दिवसांत पुन्हा मोकाट जनावरांचा वावर सुरू होतो. आता शहरामध्ये खेचर तसेच घोड्यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: Expenditure on scrap vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.