माजी सैनिकाचा हवेत गोळीबार

By Admin | Updated: June 7, 2014 00:44 IST2014-06-07T00:38:53+5:302014-06-07T00:44:15+5:30

दसपटी विभागातील ओवळीतील घटना

Ex-serviceman firing in the air | माजी सैनिकाचा हवेत गोळीबार

माजी सैनिकाचा हवेत गोळीबार

शिरगाव : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका माजी सैनिकाने हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याच प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी (दि. ४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दसपटी विभागातील ओवळी गावी (ता. चिपळूण) येथे घडली.
ओवळी या गावातील मनोहर शिवराम शिंदे व भगवान बाबूराव शिंदे हे आपल्या मालकीच्या शेतजमिनीत पेरणीचे काम करीत असताना बळवंत बाजीराव शिंदे यांच्याशी किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला. बळवंत शिंदे हे माजी सैनिक आहेत.
या वादातून भडकलेल्या बळवंत शिंदे यांनी आपल्या संरक्षणासाठी घेतलेली बंदूक हवेत धरून त्यामधून दोन गोळ्या झाडल्या. तसेच शिंदे यांना शिवीगाळ केली. या प्रकरणाची खबर भगवान शिंदे यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात दिली असून, बळवंत शिंदे या माजी सैनिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Ex-serviceman firing in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.