सेनेतील वादावर माजी आमदारांना कानपिचक्या

By Admin | Updated: October 4, 2015 23:35 IST2015-10-04T22:26:32+5:302015-10-04T23:35:07+5:30

नगरपंचायतीवर भगव्या फडण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.

Ex-MLAs on the debate | सेनेतील वादावर माजी आमदारांना कानपिचक्या

सेनेतील वादावर माजी आमदारांना कानपिचक्या

मंडणगड : दापोली विधानसभा मतदारसंघात मतभेद बाजूला ठेवून, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करुन त्यांचे नेतृत्व करीत मंडणगड नगरपंचायतीवर भगव्या फडण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. मंडणगड नगरपंचायतीचा नारळ आज (रविवारी) जिल्हासंपर्क प्रमुख विजय कदम यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी रामदास कदम यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना कानपिचक्या दिल्या.नगरपंचायत निवडणुका या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या अस्मितेचा प्रश्न असून नगरपंचायतीवर भगवा फडकवून आणण्यासाठी सर्वसामान्याच्या खांद्याला खांदा लाऊन बळ देण्याचे आश्वासन देताना सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते एक दिलाने निवडणुकांचा सामना करतील असे स्पष्ट केले़ राज्याचे पर्यावरण मंत्र्याने केलेली विकासकामे मी केली म्हणून तालुक्यात विकासकामांचे नारळ फोडणाऱ्या आजी आमदारांची दुसऱ्याचा बाप माझा बाप म्हणण्याची सवय फार जुनी असल्याचे सांगताना शिवसेनेशी गद्दारी केलेल्या विद्यमान आमदारांना त्यांची जागा दाखवून देण्याची गर्जना रामदास कदम यांनी यावेळी केली. पक्षांतील अंतर्गत मतभेदांवर कार्यकर्त्यांना शालजोडीतून घरचा आहेर देताना गोवळींचे जिल्हा परिषदेचे तिकीट कापले नसते तर आमदारकी गेली नसती, असा टोला त्यांनी हाणला़ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ पुन्हा एकदा ताब्यात घेणार असल्याचे व याची सुरुवात मंडणगडच्या नगरंपचायत निवडणुकांपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, संपर्कप्रमुख विजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपूरे, उपजिल्हाप्रमुख राजकूमार निगुडकर, संतोष घोसाळकर, संतोष गोवळे, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, सभापती वैशाली चोरगे, उपसभापती आदेश केणे, प्रेरणा घोसाळकर, रामदास रेवाळे, हरिश्चंद्र कदम, विकास चव्हाण, प्रताप घोसाळकर, संजीव येसावरे, रघुनाथ पोस्टुरे, विनोद जाधव, सुरेश दळवी, राजेंद्र फणसे उपस्थित होते. यावेळी संतोष गोवळे, संदीप राजपूरे, सचिन कदम आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Ex-MLAs on the debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.