शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:49 IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अत्यंत घाईघाईने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाला वालोपे येथे आतापासूनच खड्डे व तडे गेले आहेत. काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात आला आहे. एकीकडे तडे गेलेली गटारे ढासळलेल्या स्थितीत असतानाच आता काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाही. कापसाळ ते खेरशेतदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणात चांगली प्रगती आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग मिळत आहे.तूर्तास परशुराम घाटात एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दरडीच्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यावर ठेकेदार कंपनीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरण आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे.  याच जोडीला शहरातील बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.एकूणच चिपळूण हद्दीत चौपदरीकरणाच्या कामास वेग आला असला, तरी काही ठिकाणी अतिशय घाईघाईने काँक्रिटीकरण केले जात आहे. विशेषतः शहरानजीकच्या वालोपे परिसरात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी खड्डे पडून तडेही गेले आहेत. त्यावर पाऊस पडताच हे तडे आणखी उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या या परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत.गतवर्षी कामथे घाटमाथ्याच्या जवळच काँक्रिटीकरणाचा काही भाग खचला होता. याविषयी वर्षभर ओरड झाल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर चौदरीकरणाअंतर्गत उभारलेले दुभाजकही अनेक ठिकाणी ढासळले आहेत. कापसाळ येथेही मुख्य काँक्रिटीकरण रस्त्याला समपातळी राहिलेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाई नको, असा सूर वाहतूकदारांसह ग्रामस्थांमधूनही उमटू लागला आहे.चौपदरीकरणातील गटारांनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. चिपळूण, कळबंस्ते, वालोपे, कापसाळ येथे काही ठिकाणी गटारे कोसळलेल्या स्थितीत आहेत. तेथे दुरुस्ती गरजेचीच आहे.

पावसाळा येतोयउशिरा सुरू होत असला तरी एकदा सुरू झाल्यानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढतो. त्यामुळे काँक्रिटीकरणाला पडलेले खड्डे वाढण्याची भीती आहे. तसेच वेगात जाणाया वाहनांचा, विशेषत: दुचाकींचा या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा