पावसाच्या विश्रांतीनंतरही घरे बाधित हाेण्याचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:00+5:302021-08-14T04:37:00+5:30

देवरुख : अतिवृष्टीसदृश्य पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्‍याला चांगलाच बसला आहे. पुराबरोबरच दरड कोसळणे, डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन ...

Even after the rains subsided, the crisis of houses being disrupted continued | पावसाच्या विश्रांतीनंतरही घरे बाधित हाेण्याचे संकट कायम

पावसाच्या विश्रांतीनंतरही घरे बाधित हाेण्याचे संकट कायम

देवरुख : अतिवृष्टीसदृश्य पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्‍याला चांगलाच बसला आहे. पुराबरोबरच दरड कोसळणे, डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन आदी प्रकारांमुळे तालुक्‍यातील ४५ गावांमधील सुमारे ९८३ घरे बाधित होऊन त्यांना धोका निर्माण झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी घरे बाधित होण्याचे संकट कायम आहे. या बाधित झालेल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, तर काहींना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार सुहास थाेरात यांनी दिली.

अनेक ठिकाणी महसूलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्याचे पंचनामे केले आहेत तर काही ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञांनीही भेट दिली आहे. देवरुख तहसील कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील निढळेवाडीतील १ घर, तळेतील मांजरेकरवाडी २२, कळंबटेवाडी ९, कांटेतील महालक्ष्मीवाडी १४, मानसकोंड येथील फेफडेवाडी ६, किंजळेवाडी १, सोनगिरीतील मोहल्ला ३, कसबा-संगमेश्‍वर येथील शास्त्रीपुलाजवळ ७, भोईवाडी २ घरे, रामपेठमधील पैसाफंड हायस्कूलजवळ २, कोळंबे - चव्हाणवाडी ११, भरणकरवाडी १३, कातुर्डीकोंड ६, नायरीतील माचवाडी ४ व पेठ १, बौद्धवाडी अंशत: ९, तिवरे घेराप्रचितगड पेठवाडी ३, धनगरवाडी (बौद्धवाडीचे बाजूस) ५, कुणबीवाडी २१, गुरववाडी ३, बौद्धवाडी ६, मराठवाडी ४, पवारकोंड ३, मलदेवाडीतील रामवाडीत ८ व मळदोबावाडीतील ५ घरे धोक्याच्या छायेखाली आहेत.

मासरंग येथील बौद्धवाडीत ६, कासेतील पिंपळवाडीत १३ व गुढेवाडी १२, नारडुवेतील मधलीवाडी, गवळीवाडी ३२ घरे, जोगळेकरवाडी ९, निनावे - नारकरवाडीत ४७, रामवाडीत ४६, दख्खन - माईनवाडीत २३, ससेवाडीत ७, निवधे - गुरववाडीत २२, तर बेर्डेवाडीत १० घरे, कदमवाडी, चव्हाणवाडी १८, गवळीवाडी १७, पन्हाळी धनगरवाडी ९, नारायण धनगरवाडीत १९, मुर्शी - गावडेवाडी ७७, धनगरवाडी भेंडीचा माळ ८, भडकंबा - पाकतेकरवाडी १७, मोरेवाडी १५, किरबेट - सुतारवाडी ३२, देवडे - धुमकवाडी १५, पुर्ये तर्फ देवळे - बौद्धवाडी २, गवळीवाडी ११, धनगरवाडी १७, शिंदेवाडी ४, तुळजापूरवाडी ६, तिवरे तर्फ देवळे - खालचीवाडी ५, आंगवली - जाधववाडी ९, धनगरवाडी ७, निवे खुर्द - परबवाडी ८, बामणोली - उगवतीवाडी २६, मधलीवाडी ६१ व मावळतीवाडी ३५, करंडेवाडीतील ६० घरांना धोका निर्माण झाला आहे.

तसेच ओझरे बुद्रुक - गुरववाडी २४, मधलीवाडी १०, कुळेवाडी ७, शेजवळवाडी ७, शेजवळवाडी वरची २, शेजवळवाडी दुसरी ८, लोहारवाडी १२, दळवीवाडी १२, बौद्धवाडी १४, कोंढण - खोगटेवाडी, शिंदेवाडी, वरचीवाडी ९ घरे, पांगरी - बौद्धवाडी ३, कुळे - धनगरवाडीत ८, देवळे घेराप्रचितगडमधील धनगरवाडी (विठ्ठल-रखुमाई मंदिर) २, फणसवळे - मोर्डेकरवाडी ९, काटवली - पड्याळवाडी २४ घरे, धनगरवाडी ३, विप्रवली - बौद्धवाडी २ व राववाडी २, फुणगूस - धुळवाडीत ७, कोंड्ये - मधलीवाडी ६, कुचांबे - गुरववाडी, थेराडेवाडी ५, राजिवली - शिर्केवाडी ३ घरे अशा तालुक्‍यातील एकूण ४५ गावांमधील सुमारे ९८३ घरांना धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Even after the rains subsided, the crisis of houses being disrupted continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.