लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST2021-07-07T04:38:22+5:302021-07-07T04:38:22+5:30

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या माध्यमातून व सुनीलदत्त देसाई यांच्या प्रयत्नातून लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलची स्थापना ...

Establishment of Lions Club of Hatkhamba Royal | लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलची स्थापना

लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलची स्थापना

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या माध्यमातून व सुनीलदत्त देसाई यांच्या प्रयत्नातून लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलची स्थापना करण्यात आली आहे. क्लबचे अध्यक्ष म्हणून मनोजकुमार खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे.

नव्याने स्थापन केलेल्या क्लबच्या सचिवपदी सैफुद्दिन पठाण, खजिनदार गिरीश शितप यांची नियुक्ती केली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून संतोष गुरव, सहसचिव दत्तात्रय क्षीरसागर, सहखजिनदार म्हणून डॉ. अंकिता देसाई यांची नियुक्ती झाली आहे. क्लबचे मार्गदर्शक म्हणून शेखर कोवळे काम पाहणार आहेत. क्लबमध्ये अमित देसाई, रणजित देसाई, ॲड. संकेत लकेश्री, मंगेश जाधव, ॲड. अवधूत कळंबटे, संदेश शिंदे, ओंकार मोघे, सचिन सावेकर, गौरी सावंत-सावेकर, मनस्वी जाधव, नेहा सुर्वे, स्नेहा सागवेकर, शुभाली झगडे, प्रतीक कळंबटे हे काम पाहणार आहेत.

Web Title: Establishment of Lions Club of Hatkhamba Royal