शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन

By मेहरून नाकाडे | Updated: April 29, 2025 13:30 IST

रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण , महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार ...

रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. या अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) ही संघटना अभियंत्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. या संघटनेने महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी आणि अपारदर्शी धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.शहरातील कोकण परिमंडल कार्यालयासमोर सर्व अभियंत्यांनी एकत्रित येत आंदोलन केले.सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे रत्नागिरीतील सहसचिव नबील मोंगल यांनी, महावितरणातील बदली धोरण, कर्मचारी भरती, स्टाफ सेटअप आणि कंपनीच्या पुनर्रचनेबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. यामध्ये अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नाही, तसेच पारदर्शक धोरणांचा अवलंब केला जात नाही. याचा परिणाम केवळ अभियंत्यांवरच नव्हे, तर वीज ग्राहकांवरही होणार आहे. याविरोधात संघटनेने अभिनव आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार सोडणे, महावितरणच्या मोबाइल क्रमांकावरील कॉल कार्यकारी अभियंत्यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट करणे, प्रशासनाचे व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, तसेच पेन डाऊन आणि कॉम्प्युटर डाऊन आंदोलनाचा समावेश असल्याचे सांगितले.रत्नागिरीत वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या रिक्त जागा असून, या जागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अभियंत्यांवर टाकला जात आहे. आता या आंदोलनात अभियंत्यांनी हा कार्यभार सोडला आहे. तसेच, प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी कॉल डायव्हर्टचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन ग्राहकांविरोधात नाही मात्र वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंते रात्रंदिवस कार्यरत असल्याचे संघटनेचे सहसचिव मोंगल यांनी सांगितले.या आंदोलनात रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, लोटे आदी तालुक्यांतील शंभरपेक्षा जास्त अभियंते सहभागी आहेत. संघटनेने वीज ग्राहकांना या आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाने अभियंत्यांच्या मागण्या मान्य करून पारदर्शक धोरणे राबवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन