शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 10:23 IST

इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. रविवारी सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला असून, गाडी विलवडे स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघालेली कोकणकन्या गोव्यापासून जवळपास अडीचशे किलोमीटर अंतरावर बंद पडली.

इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होईल, याविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी विलवडे रेल्वे स्थानकात कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे. सकाळच्या वेळेस जवळपास दोन तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११.५ वाजता सुटते. पहाटे ५‌.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकादरम्यान गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकणकन्या दोन तासांपासून थांबून आहे. मुंबईहून रात्री निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस गोव्यातील मडगांव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजता पोहोचते. मात्र, दोनपेक्षा अधिक तासांपासून ही गाडी रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

टॅग्स :railwayरेल्वे