कर्मचारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:00+5:302021-09-11T04:32:00+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नव्या इमारतीत तळमजल्यावर सिमेंटचा उंचवटा तयार करण्यात आला आहे. तळमजल्यावरील टाईल्स आणि सिमेंटचा उंचवटा ...

कर्मचारी त्रस्त
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नव्या इमारतीत तळमजल्यावर सिमेंटचा उंचवटा तयार करण्यात आला आहे. तळमजल्यावरील टाईल्स आणि सिमेंटचा उंचवटा यातील रंगाचा फरक चटकन लक्षात येत नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे वारंवार नागरिक, कर्मचारी अडखळत आहेत. नागरिक, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संजय चांदे यांची नियुक्ती
चिपळूण : चिपळूण युवासेना उपतालुकाप्रमुख संजय चांदे यांची कापसाळ ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी चांदे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सुनील गोरिवले, ग्रामपंचायत सदस्य संजय साळवी, सुभाष साळवी उपस्थित होते.
मुख्य रस्त्यावर सांडपाणी
दापोली : शहरातील नशेमन काॅलनी, भारतनगर येथील नागरिकांनी त्यांना दापोली नगरपंचायतीकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी नगराध्यक्षा परवीन शेख यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावेळी मकबूल दिनवारे, सईद देशमुख, शहाबुद्दीन चिपळूणकर व अन्य नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवाला प्रारंभ
दापोली : तालुक्यातील पालगड गणेश मंदिराच्या गणेशोत्सवास भाद्रपद शुक्ल प्रतिपदेपासून प्रारंभ झाला आहे. या उत्सवाला ३०० वर्षांची परंपरा असून, आजही ही परंपरा ग्रामस्थांकडून जपली जात आहे. कोरोनामुळे यावर्षी हा उत्सव वाडीमर्यादित करण्याचे श्री देव गणपती व ब्राह्मण उत्सव मंडळाने ठरविले आहे.
रस्ता बंद
गुहागर : तालुक्यातील वेलदूर - नवानगर - धोपावे मार्गावर अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या दरडीमुळे तसेच दरडीच्या ठिकाणी मोठे दगड असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. रानवी ते धोपावेमार्गे रस्ता वळविण्यात आला आहे. मात्र, अतिवृष्टी झाल्यास नवानगर येथील नऊ घरांना स्थलांतरणाची सूचना तहसीलदारांनी केली आहे.