रहदारीच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST2021-06-21T04:21:29+5:302021-06-21T04:21:29+5:30

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रभाग क्र. ९ मधील रहदारीच्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या प्रभागातील दर्गा ...

Empire of mud on traffic roads | रहदारीच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

रहदारीच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

लांजा

: लांजा नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रभाग क्र. ९ मधील रहदारीच्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

या प्रभागातील दर्गा परिसरात पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या गटाराचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने संपूर्ण बाजारपेठेतून वाहून आलेले पाणी गटार तुंबल्याने रहदारीच्या रस्त्यावर येत आहे.

त्याचप्रकारे तेलीवाडी भागासाठी जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरत आहे.

याबाबत नगरपंचात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही या गोष्टीकडे डोळेझाकपणा केला जात आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरच या गलथान कारभाराबाबत नागरिक मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Empire of mud on traffic roads