अकरा नवीन उपकेंद्र मंजूर

By Admin | Updated: September 1, 2015 21:04 IST2015-09-01T21:04:21+5:302015-09-01T21:04:21+5:30

कोकण परिमंडल : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न

Eleven new sub-stations approved | अकरा नवीन उपकेंद्र मंजूर

अकरा नवीन उपकेंद्र मंजूर



रत्नागिरी : जिल्ह्याची विजेची मागणी १८१ मेगावॅट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची मागणी ८० मेगावॅट इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १७ उपकेंद्र असून, सात नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील काही उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ उपकेंद्र असून, चार नवीन उपकेंद्र होणार आहेत. वीजपुरवठा सुरळीत देण्यासाठी उपकेंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या वाढली आहे. रत्नागिरी शहरासाठी चार वीज उपकेंद्र असताना शहरात रहाटाघर या नवीन उपकेंद्राची भर पडली आहे. शिवाय शहराला लागून असलेल्या पानवल, कोतवडे येथील दोन उपकेंद्रांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. गणपतीपूर्वी ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.
कोकणातील दमट व खाऱ्या वातावरणामुळे विजेचे लोखंडी खांब गंजतात. त्यामुळे पायाभूत आराखडा विकास योजना १ अंतर्गत २००९ मध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेचे ११ हजार जीर्ण खांब बदलण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत ६८.५९ कोटीची कामे करण्यात येणार आहेत. ५ नवीन उपकेंद्रांसह ३८२ किमी लांबीची उच्चदाब वाहिनी, २१२ लांबीच्या लघुदाब वाहिनीचा समावेश आहे. रत्नागिरी विभागातील लांजा, राजापूर, देवरूख उपविभागात मागील दोन वर्षात लघुदाब वाहिनीचे जीर्ण झालेले ३६० खांब बदलण्यात आले असून, लघुदाब वाहिनीचे १०५५ खांब बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी ४ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. चिपळूण विभागात येणाऱ्या चिपळूण व गुहागर तालुक्यात उच्चदाब वाहिनीचे ८६५, तर लघुदाब वाहिनीचे १९८९ खांब बदलण्यात येणार आहेत. यासाठी ३ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर असून, आतापर्यंत उच्चदाब वाहिनीचे ३५३, तर लघुदाब वाहिनीचे १४०० खांब बदलण्यात आले आहेत. ४१ खांब बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात उच्चदाब वाहिनीचे ३९०, तर लघुदाब वाहिनीचे १५३० खांब बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर असून, आतापर्यंत लघुदाब वाहिनीचे ९२१ खांब बदलण्यात आले असून, ५५२ खांब बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११५ किलोमीटर लघुदाब वाहिनीचे, तर ४.५ किलोमीटर उच्चदाब वाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले. एकूण ३४५ किलोमीटर लांब वाहिनीच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ विभागात येणाऱ्या सावंतवाडी, ओरोस, वेंगुर्ला तालुक्यातील लघुदाब वाहिनीचे १०२८ खांब बदलण्यात आले असून, ३३० खांब बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर एक कोटी ६० लाख रुपये खर्च होणार आहे. कुडाळ विभागात लघुदाब वाहिनीचे १७८३ खांब बदलण्याचे उद्दिष्ट आहे. कणकवली तालुक्यातील लघुदाब वाहिनीचे ३५०० खांबांपैकी १२३४ खांब बदलण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)े

सिंधुदुर्गसाठी ३६ कोटी
रत्नागिरी औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्र पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडेली, मजगाव, भुईबावडा, फणसगाव याठिकाणी नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. भुईबावडा व अडेली येथील उपकेंद्रांच्या कामाला प्रारंभ झाला आहे. अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. बिघाड दुरूस्त होण्यास वेळ असेल तर पर्यायी मार्गाने तात्पुरता वीजपुरवठा देता यावा, यासाठी उपकेंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे.

सिंधुदुर्गसाठी ३६ कोटी
रत्नागिरी औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्र पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडेली, मजगाव, भुईबावडा, फणसगाव याठिकाणी नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. भुईबावडा व अडेली येथील उपकेंद्रांच्या कामाला प्रारंभ झाला आहे. अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. बिघाड दुरूस्त होण्यास वेळ असेल तर पर्यायी मार्गाने तात्पुरता वीजपुरवठा देता यावा, यासाठी उपकेंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे.

पायाभूत विकास आराखडा क्रमांक २ च्या पहिल्या भागात विकासकामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. उच्चदाबाच्या २२५ किमी, लघुदाबाच्या ४५३ किमी वाहिन्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Eleven new sub-stations approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.