शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ शाळांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:36 IST

सव्वाचार लाख रुपयाची बिल थकीत 

रत्नागिरी : वीजबिल न भरणा केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ४७ प्राथमिक शाळांचीमहावितरणकडून वीज कापण्यात आली आहे. वीजबिलापोटी तब्बल ४ लाख २९ हजार २७० रुपये थकीत असल्याने महावितरणने ही कारवाई केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील २,४९६ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज जोडणी करण्यात आलेली आहे. तर २२ शाळांना अजूनही वीज जोडणी देण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यातील १५६ शाळांनी विविध कारणामुळे वीजबिल भरणा केलेला नाही. या शाळांनी सुमारे ६-७ महिने वीजबिलच भरलेले नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे तब्बल ४ लाख २९ हजार २७० रुपये इतकी वीजबिलाची रक्कम थकीत आहे.महावितरणने हे वीज बिल माफ करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, महावितरणने थकीत शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत ४७ प्राथमिक शाळांची वीज महावितरणने खंडित केली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत शाळांच्या खंडित वीजपुरवठा विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान रत्नागिरी, खेड व राजापूर या तीन तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांनी गेले सहा महिने शाळांची वीज तोडल्याचा अहवालच दिलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या हलगर्जीपणाबद्दल शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाईचे संकेत मिळत आहेत.

वीज खंडित शाळामंडणगड - ५, दापोली - १५, गुहागर - ८, चिपळूण- ४, संगमेश्वर- ६, लांजा -९

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाmahavitaranमहावितरण