शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत २३ कोटींचे वीजबिल थकले, आता भारनियमनाचे चटके?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:48 IST

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ...

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ग्राहकांकडे २३ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार ग्राहकांना भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी पथदीप ग्राहकांची आहे. पथदीपची १,६९० स्थानिक स्वराज्य संस्थाकडे ६ कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही पाठपुरावा सुरू आहे. त्यापाठोपाठ ८२,३४५ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे.

महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीज गळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते. सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.

वीजबिल वेळेवर न भरल्यामुळे थकबाकी वाढली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेची बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा वसुली पथकाला कारवाई करणे भाग पडेल. कारवाई टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन यापैकी सोयिस्कर पर्यायाचा अवलंब करावा. - स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी

घरगुतीग्राहक : ८२,३४५थकबाकी : ६ कोटी ५० लाख

वाणिज्यिकग्राहक ८२७६थकबाकी - २ कोटी ४४ लाख

औद्योगिकग्राहक : ७९६थकबाकी एक कोटी ८ लाख

कृषी पंपग्राहक : ८४३२थकबाकी २ कोटी ८५ लाख

पथदीपग्राहक : १६९०थकबाकी ६ कोटी ८६

सार्वजनिक पाणीपुरवठाग्राहक ११७५थकबाकी २ कोटी ५५- एकूण ग्राहक १,०५,३९३थकबाकी २३ कोटी ८८

चिपळूण विभागग्राहक २७,१७७थकबाकी ५ कोटी ४० लाख

खेड विभागग्राहक २९,८६०थकबाकी ७ कोटी २१ लाख

रत्नागिरी विभागग्राहक ४८,३५६थकबाकी २३ कोटी ८८ लाख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण