जिल्ह्यात १८८ ग्रामपंचायतींच्या २६५ प्रभागांसाठी निवडणूक
By Admin | Updated: July 7, 2015 23:13 IST2015-07-07T23:13:08+5:302015-07-07T23:13:08+5:30
निवडणूक कार्यक्रम : आॅगस्टमध्ये ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी, राजकीय पक्षांची वर्चस्वासाठी रस्सीखेच

जिल्ह्यात १८८ ग्रामपंचायतींच्या २६५ प्रभागांसाठी निवडणूक
रत्नागिरी : सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींच्या एकूण २६५ प्रभागांतील २८७ रिक्त जागांसाठी येत्या आॅगस्टमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या एकाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील उक्षी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या १८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी २ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मतदान होणार आहे.
यासाठी शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. १३ ते २० जुलै या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे.
मतदान २ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)