जिल्ह्यात २२ सहकारी संस्थांच्या निवडणुका
By Admin | Updated: February 26, 2015 00:12 IST2015-02-25T22:19:40+5:302015-02-26T00:12:33+5:30
जिल्हा उपनिबंधक : २७ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान होणार मतदान

जिल्ह्यात २२ सहकारी संस्थांच्या निवडणुका
रत्नागिरी : महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०१४ अधिनियम १८ नुसार ‘ब’ वर्गात मोडणाऱ्या जिल्ह्यातील २२ सहकारी संस्थांचा २७ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.गुहागर तालुक्यातील गुहागर कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आबलोलीची निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे. यासाठी २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते २ या वेळेत अर्ज दाखल करणे, ३ रोजी छाननी, ४ रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ४ ते १८ या कालावधीत अर्ज मागे घेणे, १९ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करणे, तर २७ रोजी निवडणुका असा कार्यक्रम आहे.गुहागरमधील ३, चिपळूणमधील २, दापोली ४, खेड १, रत्नागिरी २, राजापूर २ अशा १४ सहकारी संस्थांच्या निवडणुका २९ रोजी होणार आहेत. मतमोजणी ३० रोजी आहे. दापोली १, चिपळूण ३, रत्नागिरी १ आणि राजापुरातील ४ सहकारी संस्थांच्या ५ एप्रिल रोेजी निवडणुका होणार आहेत. यासाठी ६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध केला जाणार आहे. कार्यालयाकडे आलेल्या अर्जाची यादी दररोज सायंकाळी ४ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान व मतमोजणी स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मागाहून जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)