निवडणूक विभाग: विधानसभालढवणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनाकडे केला खर्च सादर

By Admin | Updated: November 26, 2014 00:03 IST2014-11-25T22:20:53+5:302014-11-26T00:03:02+5:30

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र देसाई खर्चात आघाडीवर, सूर्यकांत दळवी दुसऱ्या क्रमांकावर, संजय यादवराव तृतीय क्रमांकावर

Election Department: Candidates holding legislative expenses submitted to the administration | निवडणूक विभाग: विधानसभालढवणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनाकडे केला खर्च सादर

निवडणूक विभाग: विधानसभालढवणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनाकडे केला खर्च सादर

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या पाच मतदार संघातील ४४ उमेदवारांनी १९ नोव्हेंबरपर्यंतचा आपला निवडणुकीचा खर्च नुकताच प्रशासनाकडे सादर केला आहे. पाचही मतदार संघात आतापर्यंत केलेल्या खर्चात राजापूर मतदार संघातील उमेदवार राजेंद्र देसाई प्रथम क्रमांकावर असून, त्याखालोखाल दापोली मतदार संघातील सूर्यकांत दळवी आणि राजापूर मतदार संघातील संजय यादव यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक कायम राखला आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रूपये खर्चाची मर्यादा घालून दिली होती. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे या सर्व उमेदवारांना दररोज प्रचार सभा तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा खर्च सादर करावा लागतो. पाच मतदार संघातील ४१ उमेदवारांनी २७ सप्टेंबर ते मतमोजणीच्या दिनांकापर्यंत झालेला खर्च नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यातील पाचही मतदार संघात आतापर्यंत केलेल्या खर्चात राजापूर मतदार संघातील उमेदवार राजेंद्र देसाई यांचा सर्वाधिक खर्च (१६,८२,९८१ रूपये) इतका झाला असून, त्याखालोखाल दापोली मतदार संघातील सूर्यकांत दळवी (१६,२२,९९० रूपये) आणि तृतीय क्रमांकावर राजापूर मतदार संघातील संजय यादवराव (१३,४३,९८४ रूपये) यांचा झाला आहे.
दापोलीत सूर्यकांत दळवी, गुहागरात भास्कर जाधव (१०,९७,०८५ रूपये), चिपळुणात माधव गवळी (१०,२८,८७८ रूपये), रत्नागिरीत बशीर मुर्तुझा (६,८१,३७७ रूपये) आणि राजापुरात राजेंद्र देसाई (१६,८२,९८१ रूपये) आघाडीवर आहेत. ४४ उमेदवारांपैकी २५ उमेदवारांचा खर्च लाखापेक्षा जास्त असून, उर्वरितांची आकडेवारी हजारात आहे.
यापैकी दापोलीतील आठ, गुहागरातील पाच, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापुरातील प्रत्येकी चार अशा १८ उमेदवारांचा खर्च लाखापेक्षा अधिक आहे, तर उर्वरित उमेदवारांचा खर्च हजारात आहे.
विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यातील खर्च सर्व उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला असल्याचे सांगण्यात आले. या खर्चाच्या तपशीलाबाबत प्रशासनाने माहिती देण्यात आली. या खर्चाच्या तपशीलानुसार पराभूत उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र देसाई खर्चात आघाडीवर, सूर्यकांत दळवी दुसऱ्या क्रमांकावर, संजय यादवराव तृतीय क्रमांकावर राहिल्याने पराभूत उमेदवारच विधानसभा निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत आघाडीवर राहिल्याचे चित्र समोर आले आहे. दापोलीतील ८, गुहागरातील पाच, चिपळूण, रत्नागिरी व राजापुरातील प्रत्येकी चार अशा १८ उमेदवारांचा खर्च लाखापेक्षा अधिक आहे. या निवडणुकीत पराभूत उमेदवारांचा खर्च पाहिल्यानंतर लक्षात येते.

विधानसभा निवडणुकीत राजेंद्र देसाई खर्चात आघाडीवर, सूर्यकांत दळवी दुसऱ्या क्रमांकावर, संजय यादवराव तृतीय क्रमांकावर राहिल्याने पराभूत उमेदवारच विधानसभा निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत आघाडीवर राहिल्याचे चित्र समोर आले आहे. दापोलीतील ८, गुहागरातील पाच, चिपळूण, रत्नागिरी व राजापुरातील प्रत्येकी चार अशा १८ उमेदवारांचा खर्च लाखापेक्षा अधिक आहे. या निवडणुकीत पराभूत उमेदवारांचा खर्च पाहिल्यानंतर लक्षात येते.

उमेदवाराचे नाव खर्च
भास्कर जाधव10,97,085
डॉ. विनय नातू10,47,921
संदीप सावंत1,57,980
सुरेश गमरे1,86,344
विजय भोसले8,32,917


उमेदवाराचे नाव खर्च
सदानंद चव्हाण9,12,576
शेखर निकम9,87,410
रश्मी कदम7,31,248
माधव गवळी10,28,778


उमेदवाराचे नावखर्च
उदय सामंत9,41,908
सुरेंद्र माने9,65,946
बशीर मुर्तुझा6,81,377
रमेश कीर6,07,042

ंउमेदवाराचे नाव खर्च
संजय यादवराव13,43,984
राजेंद्र देसाई16,82,981
राजन साळवी10,66,927
अजित 5,70,963
यशवंतराव

Web Title: Election Department: Candidates holding legislative expenses submitted to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.