राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:54 AM2020-12-29T11:54:40+5:302020-12-29T11:58:04+5:30

Grampanchyat Elecation Rajapur- राजापूर तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून आपापली ताकद आजमावली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.

Election of 51 Gram Panchayats in Rajapur taluka, women's vote is important | राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा

राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी

राजापूर : तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून आपापली ताकद आजमावली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या मतदारांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची ३ हजार ५११ एवढी मतदारसंख्या जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांच्या भवितव्याची दोरी महिलांच्या हाती राहणार आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार कोरोनामुळे प्रशासकांच्या हाती देण्यात आला होता. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये १५६ प्रभागातील ३९९ जागांसाठी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सुरूवात झाली आहे.

१५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामीण भागातील राजकारणावरील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या करीत आपापल्या पक्षाचे पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये काही गावांमधील मोजक्याच राजकीय पक्षांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे.

या निवडणुकीमध्ये ५४ हजार ६८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २५ हजार ५८९ पुरूष, तर २९ हजार १०० महिला मतदारांचा समावेश आहे. पुरूष मतदारांच्या तुलनेत ३ हजार ५११ महिला मतदारांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्ये राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसमोर राहणार आहे.

Web Title: Election of 51 Gram Panchayats in Rajapur taluka, women's vote is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.