विहिरीत उडी मारून वृद्धेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST2021-03-17T04:32:00+5:302021-03-17T04:32:00+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द येथे वृद्धेने घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, १६ मार्च रोजी दुपारी ...

विहिरीत उडी मारून वृद्धेची आत्महत्या
रत्नागिरी : शहरानजीकच्या पोमेंडी खुर्द येथे वृद्धेने घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, १६ मार्च रोजी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अल्पना अंकुश पिलणकर (वय ६०, रा. पोमेंडी खुर्द, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पना अंकुश पिलणकर या गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. मंगळवारी दुपारी त्या घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना, घराजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. सायंकाळी उशिरा उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.