हाेम पेटविण्यावरून बामणाेलीत हाणामारी, आठजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:15+5:302021-03-30T04:19:15+5:30
मंडणगड : हाेम पेटविण्याच्या कारणावरून बामणाेली (ता. मंडणगड) येथे हाणामारी झाल्याची घटना २८ मार्च राेजी पहाटे २.४५ वाजण्याच्या दरम्यान ...

हाेम पेटविण्यावरून बामणाेलीत हाणामारी, आठजणांवर गुन्हा दाखल
मंडणगड : हाेम पेटविण्याच्या कारणावरून बामणाेली (ता. मंडणगड) येथे हाणामारी झाल्याची घटना २८ मार्च राेजी पहाटे २.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मंडणगड पाेलीस ठाण्यात आठजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश कृष्णा जाधव यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. दि. २८ मार्च रोजी योगेश जाधव, विनेश साळवी, शैलेश जाधव, अमित साळवी, अभिजित साळवी (सर्व रा. बामणघर मराठवाडी) हे सुनील धोंडगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गप्पागोष्टी करीत होते. त्याठिकाणी कुंदन कडव, संजय गोठल, प्रीतेश गोठल, परेश गोठल, प्रथमेश गोठल, किरण कडव, प्रदीप खांबे, विशाल कडव व ग्रामस्थ होळीचा होम लावण्याकरिता एकत्रित जमले होते. त्यांना विनेश साळवी व संदीप खांबे यांनी गावातील ग्रामस्थांनी सकाळी तीन वाजता होळीचा होम लावण्याबाबत ठरविलेले असल्याचे सांगितले. त्यावर विनेश साळवी यांनी विराेध करून धक्काबुक्की केली.
तसेच योगेश जाधव व अन्य लोकांनी विचारणा केली असता, त्याचा राग आल्याने ठोशाने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, प्रीतेश गोठल यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कड्याने कृष्णा जाधव यांच्या कपाळावर मारून दुखापत केली. झालेल्या झटापटीत कृष्णा जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही तोडली. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पाेलीस करत आहेत.