शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

पालीत बस धडकेत आठ जखमी, बसचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:30 IST

मुंबई - गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी पाली बाजारपेठ देवतळे फाटा बसथांब्यानजीक दोन एस. टी. बसमधून प्रवासी उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तिसऱ्या बसने या दोन्ही बसना जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एस. टी. बसेसचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपालीत बस धडकेत आठ जखमी, बसचेही नुकसान दोन थांबलेल्या बसेसना तिसऱ्या बसची धडक

पाली : मुंबई - गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी पाली बाजारपेठ देवतळे फाटा बसथांब्यानजीक दोन एस. टी. बसमधून प्रवासी उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तिसऱ्या बसने या दोन्ही बसना जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एस. टी. बसेसचेही नुकसान झाले आहे.मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पाली बाजारपेठ देवतळे फाटा या मुंबई-गोवा महामार्गावरील बसथांब्यावर रत्नागिरी-लांजा ही एस. टी. बस प्रवासी उतरवत असतानाच पाठीमागून आलेल्या दुसऱ्या लांजा आगाराच्या रत्नागिरी - लांजा या बसचालकानेही आपल्या बसमधील प्रवाशांना उतरण्यासाठी पुढील बसच्या मागेच आपली बस थांबवली होती.

त्याचवेळी मागून आलेल्या रत्नागिरी - राजापूर या तिसऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढील बसला जोरदार धडक दिल्याने थांबलेली दुसरी बस तिच्यापुढील पहिल्या बसवर मागून आदळून झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

राजापूर आगाराच्या रत्नागिरी-राजापूर या बसवर शिवाजी लक्ष्मण हेटकळे यालाच चालक-वाहक म्हणून नेमण्यात आले होते. परंतु, त्याने त्याच्याच डेपोत कामाला असणाऱ्या व याच बसमधून प्रवास करणाऱ्या जितेंद्र झावरे याने बस चालविण्यास मागितल्याने चरवेली फाटा येथे बस चालवायला दिली. पाली येथे बस आल्यावर झावरे याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुढे रस्त्यालगत थांबलेल्या बसला त्याने मागून जोराची धडक दिली.या अपघाताची खबर एस. टी. चालक सादीक रफीक सय्यद (लांजा आगार) याने पाली पोलीस दूरक्षेत्रात दिली असून, अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैष्णवी यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करत आहेत. या अपघातानंतर एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.पालीत उपचारअपघातात संदीप रसाळ (पाली), गोपाळ ताम्हणकर (कशेळी), प्रवीण वारिशे (लांजा), जितेंद्र धाकट (राजापूर), ओंकार काळोखे (लांजा), प्रदीप तांदळे, ताराचंद्र कामटे, उदय सोलगावकर (सर्व लांजा) हे जखमी झाले. सर्व जखमींवर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी