शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त

By अरुण आडिवरेकर | Updated: April 3, 2023 11:46 IST

रत्नागिरी : सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणूक प्रकरणी ईडीकडून राज्यात कारवाई सुरू आहे. यात सहा कोटी ६९ लाखांची मालमत्ता ...

रत्नागिरी : सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणूक प्रकरणी ईडीकडून राज्यात कारवाई सुरू आहे. यात सहा कोटी ६९ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नम स्टीलचा सामावेश असून,  मॅग्नम स्टीलचे भागिदार कुणाल गांधी आणि किशोर गांधी यांची रत्नागिरीतील शेतजमीन ईडीने जप्त केली आहे.सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासलेले नाहीत. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आणला होता.बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांची संपत्ती जप्त केली होती. आता मॅग्नम स्टीलचे कुणाल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत ही कारवाई केली आहे.कुणाल गांधी आणि किशोर गांधी हे मॅग्नम स्टीलचे भागीदार आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम आपल्या इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करून त्यातून ३ तात्पुरत्या मालमत्ता खरेदी केल्या. त्यामध्ये अंधेरी, मुंबई येथे असलेले दुकान तसेच कार्यालय, पनवेल येथील एक सदनिका आणि रत्नागिरी येथे असलेल्या शेतजमिनीचा समावेश आहे. पुणे शहरातही ५.२४ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी खरेदी केली होती. या सर्व ठिकाणी कारवाई करून मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय