देवरूख : साडवली एमआयडीसीतील सुश्रुत कंपनीतील कामगार युनियनच्या कामासाठी मुंंबईत जात असताना मुंबई गोवा महामार्गावर इको कारने डंपरला मागून धडक दिल्याने पेण रेल्वे स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पपु चाळके जागीच ठार झाला तर इतर सहाजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या इकोकारने (एमएच-०८एएन-४८३१) डंपरला (एमएच०८ईबी-७८९१) मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की डंपर रस्ता सोडून खाली घसरला. या अपघातात विनोद उर्फ पपू वसंत चाळके (४२) हा जागीच ठार झाला तर गाडीतील इतर ६जण जखमी झाले असून त्यातील २ जण गंभीर आहेत.अपघातातील जखमींपैकी नंदकुमार भिकाजी बांडागले (४४, मुरादपूर), रमेश गोपाळ (४७, पाटगांव), प्रदीप मांडवकर (५१, देवरूख) हे तिघे गंभीर असून जयवंत श्रीराम शिर्के (४५, वरचीआळी देवरूख), सतीश रामचंद्र्र भोपळे (४७, देवरूख), इकोचालक प्रकाश हिराजी चाचे (५२, मुरादपुर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना त्वरीत शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इको कारची डंपरला धडक; एक ठार, तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:19 IST
साडवली एमआयडीसीतील सुश्रुत कंपनीतील कामगार युनियनच्या कामासाठी मुंंबईत जात असताना मुंबई गोवा महामार्गावर इको कारने डंपरला मागून धडक दिल्याने पेण रेल्वे स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पपु चाळके जागीच ठार झाला तर इतर सहाजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
इको कारची डंपरला धडक; एक ठार, तीन गंभीर
ठळक मुद्देइको कारची डंपरला धडक; एक ठार, तीन गंभीरजखमी शासकिय रुग्णालयात दाखल, उपचार सुरू