मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुकर : अमिता तळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:03+5:302021-09-13T04:30:03+5:30
टेंभ्ये प्रशालेत गुणगौरव सोहळा ! लाेकमत न्यूज नेटवर्क टेंभ्ये : मूलभूत संकल्पना मातृभाषेतून अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. यामुळे मराठी ...

मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुकर : अमिता तळेकर
टेंभ्ये प्रशालेत गुणगौरव सोहळा !
लाेकमत न्यूज नेटवर्क
टेंभ्ये : मूलभूत संकल्पना मातृभाषेतून अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. यामुळे मराठी माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा मार्ग अधिक सुकर होतो. स्वतःला काय बनायचे आहे हे लवकर ठरवा. त्यामुळे ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. ग्रामीण भागातील व प्रतिकूल परिस्थितीमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मत रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांनी व्यक्त केले.
त्या कै. बा. रा. नागवेकर तथा हातीसकर मास्तर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, टेंभ्ये प्रशालेमध्ये आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. वाचन महत्त्वाचे असून, आत्मचरित्रांचे वाचन प्रेरणादायी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. संस्थाध्यक्ष उत्तम नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कै. धोंडबाराव भिवाजीराव साळवी संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनंतराव साळवी, सचिव राजाभाऊ साळवी, सहसचिव विजय नागवेकर, खजिनदार रामचंद्र शिंदे, सदस्य संतोष साळवी, आशा साळवी, ॲड. तुषार नागवेकर, तृप्ती नागवेकर, अध्यापक योगेश साळवी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. ए. उरूनकर उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. ए. उरूनकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख अतिथी अमिता तळेकर व संगणक कक्षाचे देणगीदार संतोष साळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी ऋषिकेश नागवेकर व विनिता साळवी यांनी लॉ पदवी प्राप्त केल्याने त्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्था सदस्य संतोष साळवी, ॲड. तुषार नागवेक, संस्था सचिव राजाभाऊ साळवी, उत्तम नागवेकर यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक सागर पाटील यांनी केले तर आभार अध्यापिका श्रिया साळवी यांनी मानले.